Posts

Showing posts from April, 2023

लघुकथा : रूस्तुमा

        रातकिड्यांचा किर्रर्र आवाज चहूबाजूंनी सुरू होता. राञ बरीच चढली होती. अशा वेळी रूस्तूमाच्या घरातला टि. व्ही. तालासुरात भैरवी का गातोय. याचा राहुन राहुन दौलादा विचार करू लागला. एकाकी विकल दौलादा... रात असो कि दिस एकटेपणा माणसाला खायला उठते. हेच खरे ! अशा वेगवेगळ्या विचारात तो या अंगाहुन त्या अंगावर कड बदलत व्हता. माञ झोप काही येत नव्हती. अशा कडबदलीत तास दीडतास उलटून गेला. आता टि. व्ही. सुई $$ सुई $$ असा रेकू लागला. राहावलं नाही     त्याला. आपल्या खोपटाचा झोपाटा लावून तो रूस्तूमाच्या घराच्या दिशेने निघाला. रूस्तूमाच घर बर्‍यापैकी. घरात कुलर, पंखा वाजवीचाच आणि जुनाच चालू असलेला टि. व्ही. मनोरंजनाच साधन. तेवढाच काय तो बदल. विचारांच्या तंद्रीत तो रूस्तूमाच्या दारात कधी पोहचला. हे त्याच त्यालाच कळले नाही.  'रूस्तूमा  $$ अरे ओ रूस्तूमा $$ ' त्यान आवाज दिला. राञीच्या त्या भेसूर किर्र काळोखात त्याचा आवाज त्यालाच भयाण भिसुर भासला. त्यानं पुन्हा आवाज दिला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यान दरवाजा ढकलला. दरवाजा कुई  $$ करीत उघडला गेला...